दक्षिण भारतातील मंदिरापैकी एक विशेष असे मंदिर म्हणजे श्री कालहस्ती मंदिर. श्री कालहस्ती मंदिर हे तिरुपती पासून 40 किलोमीटर अंतरावर आहे. या मंदिराचा विस्तार अतिशय मोठा आणि दगडी बांधकामांमध्ये केलेला आहे. हे मंदिर हत्ती साप आणि कोळी या तीन प्राण्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन महादेवाने येथे लिंग स्थापन केले असे सांगितले जाते. राहू आणि केतू दोष निवारणासाठी या मंदिराला भारतातून लोक येत असतात. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर ग्रहण असतानाही बंद केले जात नाही. लग्न जमत नसल्यास या मंदिरामध्ये जाऊन पूजा विधी केल्यानंतर खात्रीने लग्न जमले जातात असे येथील पुजाऱ्या करून सांगण्यात येते. श्री कालहस्ती मंदिराला दक्षिणेकडील काशी म्हणून ओळखले जाते. हे मंदिर कैलास गिरी नावाच्या पर्वताच्या पायथ्याशी आहे या पर्वतावर श्री शंभूची मोठी मूर्ती आहे. पंचमहाभूतांतील एक तत्त्व म्हणजे वायू तत्व. श्री कालहस्ती हे मंदिर वायु तत्व या महाभूताला समर्पित आहे. तिरुपतीचे दर्शन झाल्यानंतर अनेक भक्त भाविक श्री कालहस्तीचे दर्शन घेण्यासाठी जात असतात. श्री कालहस्ती हे तीर्थक्षेत्राबरोबरच पर्यटन स्थळ म्हणूनही ओळखले जाते. श्री कालहस्ती मंदिरामध्ये अन्नप्रसादाची सोय आहे. दक्षिण भारतातील अन्नप्रसादाचा एक विशेष स्वाद या मंदिरामध्ये मिळतो. मंदिराचे बांधकाम हे भव्य स्वरूपाचे आहे. तिरुपतीचे दर्शन घेतल्यानंतर श्री कालहस्तीचे दर्शन घेणे हे खूप महत्त्वाचे आहे.....
.jpg) |
श्रीकालहस्ती विहंगम दृश्य |
हिमालयातील कैलास पर्वत आणि दक्षिण भारतातील श्री कालहस्ती हे पवित्र मंदिर समजले जातात. हे मंदिर पाचव्या शतकामध्ये पल्लव राजांनी निर्माण केलेले आहे असे सांगितले जाते. श्री कालहस्ती या नावामध्ये दडलेला अर्थ म्हणजे श्री म्हणजे कोळी काल म्हणजे सर्प आणि हस्ती म्हणजे हत्ती. पुराणातील कथेनुसार या तीन प्राण्यांच्या भक्तीमुळे शिव प्रसन्न होऊन त्यांनी येथे आपले लिंग स्थापन केले. मान्यता आहे की श्री कालहस्तीचे दर्शन केल्यानंतर केव्हा तेथील पूजा विधी केल्यानंतर इतर कोणत्याही मंदिरामध्ये दर्शन न घेता किंवा आपल्या मित्र नातेवाईकाकडे न जाता सरळ सरळ आपल्या घरी निघून जाणे महत्त्वाचे आहे. तिरुपतीहून श्री कालहस्ती ला जाण्यासाठी तिरुपती वरून बसेस तसेच खाजगी वाहन उपलब्ध असतात.
 |
श्री. सिध्दी विनायक मंदिर श्रीकालहस्ती |
.jpg) |
मंदिर प्रेवशव्दार श्रीकालहस्ती |
No comments