मनाचा थकवा गणपतीपुळे येथे गेल्यावर कमी होतो !
गणपतीपुळे
महाराष्ट्रातील अनेक पर्यटन स्थळांपैकी गणपतीपुळे हे पर्यटन स्थळ पर्यटकांसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. महाराष्ट्राच्या पश्चिम दिशेला असलेल्या अरबी समुद्राच्या काठावर वसलेले गणपतीपुळे हे ठिकाण पर्यटनाची मेजवानी म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय ठिकाणांपैकी एक आहे हे ठिकाण महाराष्ट्राच्या कोकण भागातील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पश्चिम किनाऱ्यावर वसलेले आहे गणपतीपुळे हे पर्यटन स्थळ महाराष्ट्रातील बरेच पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे रोजच्या तणाव मुक्त जीवनातून बाहेर घेण्यासाठी आणि निसर्गाच्या सौंदर्यात कुटुंबासमवेत किंवा मित्रांबरोबर वेळ घालवण्यासाठी हे योग्य ठिकाण आहे. गणपतीपुळे हे ठिकाण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे.
गणपतीपुळे येथे विस्तीर्ण असा समुद्रकिनारा आहे. भक्ती आणि मनाची शांतता याचा संगम या गणपतीपुळे येथे पाहायला मिळतो. येथे स्वयंभू असे श्री गणेशाचे मंदिर आहे. नारळाच्या उंच उंच झाडामध्ये वसलेले हे ठिकाण मनाला उल्हासित करते. भक्ताच्या नवसाला पावणारा गणपती म्हणून गणपतीपुळेच्या गणपतीची ख्याती आहे. गणपतीपुळे चे मंदिर हे अतिशय प्राचीन आहे. मंदिराचा परिसर अतिशय सुंदर आणि स्वच्छ आहे. हे मंदिर हिरव्यागार वनराईने वेढलेले आहे. थकलेल्या मनाचा थकवा हे बीच पाहिल्यानंतर निघून जातो. समुद्रावर फिरण्याचा आणि समुद्र काठावरील वाळूमध्ये खेळण्याचा मनमुराद आनंद या गणपतीपुळेच्या परिसरामध्ये मिळतो. गणपतीपुळे ला जाण्यासाठी चा मार्ग. गणपतीपुळेला जाण्यासाठी रेल्वेनेही जाता येते तसेच स्वतःच्या गाडीने सुद्धा जाता येते.
गणपतीपुळेच्या श्री गणेशाचे दर्शन घेतल्यानंतर मनाला एक आनंद प्राप्त होतो. गणपतीपुळे येथे भक्तांसाठी जो श्री चा प्रसाद मिळतो तो अतिशय चविष्ट आहे. याप्रसादामध्ये खिचडी बुंदी आणि लोणचे दिले जाते. हा प्रसाद पोटभर खावा असे वाटते. या प्रसादाची चव वेगळीच आहे.
गणपतीपुळे येथे पर्यटकांना व भक्तांना राहण्यासाठी अनेक प्रकारचे लॉज उपलब्ध आहेत. येथे चविष्ट असे कोकणी खाद्यपदार्थ खायाला मिळतात.
गणपतीपुळे येथे भक्तांना राहण्यासाठी भक्त निवासाची सोय आहे. निसर्ग सौंदर्याचा अप्रतिम नजराना गणपतीपुळे येथे पाहायला मिळतो. एकदा गणपतीपुळे पाहिले की पुन्हा पुन्हा गणपतीपुळेला जावेसे वाटते.
![]() |
स्वादीष्ट असा गणपतीपुळे येथील श्री गणेशाचा महाप्रसाद |
![]() |
निसर्गरम्य गणपतीपुळेचा वाळूमय किनारा |
![]() |
समुद्र किना-यावरील बोट |
![]() |
महाराष्ट्र राज्य महामार्ग परिवहन महामंडळ बस सेवा |
![]() |
समुद्र किना-यावरील मनमुराद आनंद |
No comments