मैसूर -पर्यटनाचे अद्भुत स्थळ
पर्यटनाचे अद्भुत स्थळ मैसूर
दक्षिण भारतातील महत्त्वाचे पर्यटनाचे स्थळ म्हणजे म्हैसूर महसूल हे ठिकाण कर्नाटक राज्यामध्ये एक महानगर म्हणून ओळखले जाते.
मैसूरला पर्यटनाच्या दृष्टीने सुद्धा खूप महत्त्वाचे स्थान आहे. केवळ महेश्वरच नाही तर आजूबाजूचा परिसर सुद्धा पर्यटनासाठी खूप महत्त्वाचा आहे. मैसूर येथे दसरा हा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. मैसूर येथील प्रेक्षणीय स्थळे म्हणून महेश्वर महल जगन मोहन पॅलेस जय लक्ष्मी विलास ललित महल म्हैसूर संग्रहालय आणि विशेषतः वृंदावन गार्डन ही अतिशय महत्त्वाची पर्यटनासाठीची स्थळे आहेत.
म्हैसूर हे रंगीबेरंगी फुलांच्या बागांचे शहर म्हणून सुद्धा ओळखले जाते येथील चामुंडा देवीचे मंदिर अतिशय प्रसिद्ध आहे.
म्हैसूर पॅलेस
पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे केंद्र मानलेला मैसूरचा पॅलेस हा पर्यटकांचे एक आकर्षण केंद्र आहे. या पॅलेस मधील बहुमूल्य रत्नजडित सिंहासन हे दसऱ्याच्या वेळेस लोकांना पाहण्यासाठी ठेवले जाते.
चामुंडा देवीचे मंदिर
मैसूर पासून दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावर चामुंडा पहाडीवर चामुंडा देवीचे एक मंदिर आहे हे मंदिर चामुंडेश्वरी या देवीला समर्पित आहे या मंदिराची निर्मिती बाराव्या शतकामध्ये झाली असे सांगितले जाते हे मंदिर दुर्गादेवीने महिषासुराचा वध केला याचे प्रतीक म्हणून उभारण्यात आलेले आहे. या चामुंडा पर्वतावर गेल्यानंतर म्हैसूर शहराचे विलोभनीय दृश्य पर्यटकांना पहावयास मिळते. या पर्वतावर भव्य असे नंदीची मूर्ती पाहावयास मिळते.
कृष्णराज सागर
कृष्णराज सागर हा मैसूर जवळील एक भव्य असा सागर आहे हा सागर 1932 मध्ये निर्माण केला गेला असे सांगितले जाते या सागराच्या पाण्यावर म्हैसूर येथेच वृंदावन गार्डन निर्माण करण्यात आलेले आहे या वृंदावन गार्डनमध्ये सगळीकडे या सागराच्या पाण्याचा वापर करून नयनरम्य असे दृश्य बनवण्यात आलेली आहेत. कृष्णराज सागराचे दृश्य अतिशय मनमोहक आणि विस्तीर्ण असे दिसते.
वृंदावन गार्डन
मैसूर येथील प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून वृंदावन गार्डन चा उल्लेख केला जातो. मैसूर आणि वृंदावन गार्डन हे एक समीकरण आहे म्हैसूर ला गेल्यानंतर वृंदावन गार्डन न पाहणे म्हणजे पर्यटनाच्या आनंदास मुकणे होय.. वृंदावन गार्डन चे विलोभनीय दृश्य पर्यटकांना नेहमी आकर्षित करत असते येथील नयनरम्य तुषार रंगीबेरंगी नृत्य पर्यटकांना आकर्षित करते.
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)

No comments