64 योगिनी मंदिर
भारत देश मंदिरांचा देश म्हणून ओळखला जातो. या भारतात अनेक प्राचीन मंदिरे अस्तित्वात आहेत. मंदिर हे हिंदू धर्मियांचे पवित्र स्थान समजले जाते. आज आपण माहिती पाहणार आहोत 64 योगिनी मंदिराची या मंदिराला तांत्रिक विद्यापीठ असे समजले जाते. मध्यप्रदेश मधील मोरेना येथील 64 योगिनी मंदिर हे अनेक रहस्यमय कथा आणि परिपूर्ण आहे. येथे अनेक प्रकारचे तांत्रिक मांत्रिक आपली विद्या प्राप्त करण्यासाठी येतात. या 64 शेवगिणी मंदिराचे आधारावरच भारतीय संसदेची निर्मिती करण्यात आली आहे असे समजले जाते. या मंदिरामध्ये 64 शिवलिंग आहेत तसेच 64 खोल्या आहेत. या मंदिराला जगभरामध्ये तंत्र साधनेचे मंदिर म्हणून ओळखले जाते. या मंदिरामध्ये अंधार पडल्यानंतर प्रवेश दिला जात नाही. या मंदिरातील 64 योगिनी ह्या माता आदिशक्तीचा अवतार आहे असे समजले जाते. राक्षसांचा नायनाट करण्यासाठी माता आदिशक्तीने 64 योगिनी रूप घेतले होते असे समजले जाते. या मंदिराची निर्मिती सन १३२३ मध्ये कच्चेपराजे देवपाल यांनी केली होती.
No comments