Header Ads

ad728
  • Breaking News

    Welcome to Indian Pilgrimage and Tourist Places.

    अद्भुत आणि निसर्गरम्य मारलेश्वर_ कोकण दर्शन

     अद्भुत आणि निसर्गरम्य मारलेश्वर


        जिथे गेल्यानंतर आपल्या मनाला एकदम शांती मिळते आणि मन समाधान आणि चिंतामुक्त होते असे ठिकाण म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील मारलेश्वर. या परिसरात गेल्यानंतर आपल्या मनाला धडकी भरवणारे येथील वारे. येथील निसर्गरम्य सौंदर्य, येथील धबधबे ,येथील उंच उंच दिसणारे पर्वतांचे टोक मनाला भयभीत करतात.

        गर्द अशा वनराई मधून निघालेला रस्ता, चहूबाजूने वेडलेले डोंगर आणि कोकणातील ग्रामीण भाग मनाला अतिशय आनंद देऊन जातो. असे हे निसर्गरम्य ठिकाण म्हणजे मारलेश्वर.

     नमस्कार मित्रांनो, आज आपण भेट देणार आहोत ते निसर्गरम्य तिर्थक्षेत्र  मारलेश्वर.

        मारलेश्वर हे ठिकाण रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख तालुक्यामध्ये आहे. मारलेश्वरला जाण्यासाठी कोल्हापूर रत्नागिरी हायवेवरून साखरपा या गावाच्या काही अंतरावरून मारलेश्वर कडे एक नागमोडी वळणाचा रस्ता जातो. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईवरून कोकण कन्या एक्सप्रेस ने संगमेश्वरला जावे लागते आणि संगमेश्वरहून  मार्लेश्‍वरला  जाण्यासाठी अनेक वाहनांची सुविधा उपलब्ध आहे. तसेच कोल्हापूर रत्नागिरी आणि गणपतीपुळे येथून ही आपल्याला मारलेश्वर हे ठिकाण पाहण्यासाठी जाता येते. अलीकडे संगमेश्वर किंवा देवरुख येथूनही मारलेश्वरला जाण्यासाठी रिक्षा उपलब्ध आहेत. विशेषतः संगमेश्वर येथून मारळ म्हणजेच मारलेश्वरला जाण्यासाठी श्रावण महिन्यामध्ये दर सोमवारी राज्य परिवहन बसेस असतात

    चहुबाजूनी डोंगरकपारीत बसलेले उंच उंच पर्वतांचे कडे असलेले डोंगर आणि जवळूनच वाहणारी नदी असा हा मारलेश्वर चा परिसर मनाला धास्ती बसवणारा आणि आनंद देणारा आहे. मुख्य प्रवेशद्वारापासून मारलेश्वर कडे जाण्यासाठी चढणीच्या पायऱ्या आहेत. या पायऱ्या चढून काही अंतरावर गेल्यानंतर आपल्याला एका गुंफेमध्ये असलेले महादेवाचे शिवलिंग पाहावयास मिळते.  हेच मारलेश्वर तिर्थक्षेत्र आहे. रस्त्याने जाताना अनेक प्रकारचे स्टॉल पहावयास मिळतात. नाश्त्याची सोयही रस्त्याच्या कडेने असलेल्या स्टॉलमध्ये आहे. पावसाळ्याच्या दिवसात येथील दृश्य हे अतिशय नयनरम्य असते. परिसरातून वाहणारा खळखळ ओढा मनाला प्रसन्न करत असतो. मारलेश्वर म्हणजे श्री शंभूचे देवस्थान. येथील गुंफेमध्ये श्री शंभू चे दोन शिवलिंग आपणास पहावयास मिळतात. मुख्य मंदिरापासून डोंररांगेतील  कड्या कपारीचा असणारा सह्याद्रीचा नयनरम्य नजराना आपणास पाहावयास मिळतो. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वाहणारे धबधबे मनाला उल्हासित करत असतात. मारलेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर आपल्याला उत्तम दर्जाचे अनेक हॉटेल्स पाहावयास मिळतील या हॉटेलमध्ये आपल्याला चांगल्या दर्जाचा नाश्ता आणि जेवण मिळते. मारलेश्वर हे तीर्थक्षेत्र म्हणजे येथील असणारे दोन शिवलिंग. यामध्ये एक एक शिवलिंग हे स्वयंभू असलेल्या श्री मारलेश्वराची आहे आणि दुसरे शिवलिंग आहे ते म्हणजे मल्लिकार्जुन आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी येथे श्री. मारलेश्वर आणि श्री. माता गिरजाई देवी यांचा विवाह सोहळा पार पडतो. कोकण आणि सह्याद्री पर्वत पर्वताचा अद्भुत संगम असलेले मारलेश्वर चे निसर्गरम्य ठिकाण मनाला प्रसन्न करते त्यामुळे एकदा तरी मारलेश्वर चे दर्शन घ्यावे. मारलेश्वर चे निसर्गरम्य ठिकाण एकदा तरी पहावे. 

    कोकण दर्शनमध्‍ये मार्लेश्‍वरला खुुप महत्‍व आहे. मार्लेश्‍वराचा निसर्ग मनात घर करून राहतो. 

    No comments

    Post Top Ad

    ad728

    Post Bottom Ad

    ad728